नरभक्षक टी-१ वाघाला आणले गोरेवाडा प्राणिसंग्रहालयात

October 29,2020

नागपूर : २९ ऑक्टोबर - मध्य चांदा वनविभागांतर्गत राजुरा व विरुर स्टेशन वनपरिक्षेत्रात धुमाकूळ घालणाèया आर टी- १ वाघाला तब्बल नऊ महिन्यानंतर जेरबंद करण्यात वन विभागाच्या कर्मचाèयांना यश आले. मंगळवारी दुपारच्या सुमारास ही यशस्वी कामगिरी वन कर्मचाèयांनी केली. त्यानंतर या वाघाला गोरेवाड्यातील प्राणी संग्रहालयात आणण्यात आले. सध्या या वाघाला विलगीकरणात ठेवण्यात आले असल्याची माहिती गोरेवाडा प्राणी संग्रहालय प्रशासनाने दिली.

मध्य चांदा वन विभागातील राजुरा- विरुर वन परिक्षेत्रांतर्गत मानवी जीवितास धोकादायक ठरलेल्या या वाघास जेरबंद करण्याचे आदेश राज्याचे वनमंत्र्यांनी काही महिन्यांपूर्वी दिले होते. एवढेच नाही तर या परिसरातील सुमारे आठहून अधिक लोकांना या वाघाने ठार केले होते. त्यामुळे या वाघाला पकडण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू झाले. मागील अनेक महिन्यांपासून वन विभागाचे कर्मचारी वाघाला जेरबंद करण्याचे प्रयत्न करीत होते.

 एकदा हा वाघ वन कर्मचाèयांच्या हाती लागला, परंतु चक्क qपजरा तोडत चकमा देत तो पसार झाला होता. त्यानंतर परत वन कर्मचाèयांनी ठोस पावले उचलत या वाघाला परिसरातील रेल्वे पुलाखालून मंगळवारी दुपारी जेरबंद केले. यानंतर या वाघाला बुधवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास गोरेवाड्यातील वन्यप्राणी बचाव केंद्रात आणण्यात आले. वाघास वन्यप्राणी बचाव केंद्राच्या अधिकारी व पशुचिकित्सकांच्या देखरेखीखाली चिकित्सालयातील qपचèयामध्ये विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. डॉ. शिरीष उपाध्ये, डॉ. सुजित कोलंगथ, डॉ. शालिनी एस व डॉ. मयूर पावशे यांच्याकडून त्याची प्राथमिक तपासणी करण्यात आली. या वाघाच्या शरीरावर विशेषत: चेहèयावर जखमा आढळून आल्या असून त्यावर आवश्यक औषधोपचार सुरू आहे.