शरद पवारांचे राज्यपालांना खवचट पत्र, महाआघाडी आणि राज्यपाल संघर्ष वाढण्याची शक्यता

October 29,2020

मुंबई : २९ ऑक्टोबर - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाविकास आघाडीचे प्रणेते शरद पवार यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना खोचक पत्र लिहिले आहे.त्यामुळे राज्यात ठाकरे विरुद्ध राज्यपाल असा संघर्ष महाराष्ट्राने अनुभवला असून भविष्यात पवार विरुद्ध राज्यपाल असा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्याच्या राज्यपाल पदाची सूत्र हाती घेण्याला वर्ष पूर्ण झाले. त्या निमित्त राज्यपाल पदाच्या वर्षभराच्या कालावधीत केलेल्या विविध कामांची माहिती दर्शवणारे 'जनराज्यपाल' असे कॉफी टेबल बुक राजभवन सचिवल्याने प्रकाशित केले. त्याची एक प्रत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना पाठविण्यात आली होती. सदर पुस्तकाचे अवलोकन केले असता,भारतीय संविधानात 'जनराज्यपाल' असा नामोल्लेख आढळत नसल्याचे निदर्शनास आणून देत आपल्या एक वर्षाच्या मर्यादित कालावधीवर स्वप्रसिद्ध कॉफीटेबल बुक मिळाल्याचे आपल्या खोचक शब्दात सांगत राज्यपालांचे आभार मानले. शिवाय यामध्ये एखाद दुसरा वगळता शपथविधी,स्वागत समारंभ, दीक्षांत समारंभ यासारखे सोहळे, उच्च स्पदांच्या गाठीभेटी, इतर सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाची छायाचित्र या पुस्तकात पहायला मिळाल्याचे शरद पवार यांनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

मात्र निधर्मवादासांदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आपण दिलेल्या सल्ल्याची व त्या उपरांत केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतलेल्या दखलेची नोंद या माहिती पुस्तकात दिसून आली नसल्याचे खोचक शब्दात पावर यांनी राज्यपालांना कळवले. या पत्रातील पवारांचा खोचक शब्दव्यवहार पाहता शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना टार्गेट केलेल्याचे पहायला मिळते.