केंद्र सरकारच्या निर्णयाने अस्वस्थ झालेल्या पीडीपी च्या नेत्याने तोडले अकलेचे तारे

October 29,2020

जम्मू : २९ ऑक्टोबर - देशाच्या अन्य भागांतील नागरिकांना जम्मू-काश्मिरात जमीन खरेदी करण्याची परवानगी देणार्या केंद्र सरकारच्या ऐतिहासिक निर्णयामुळे पीडीपीच्या पायाखालची जमीन सरकली आहे. येथे भारतीय नागरिक स्थायी झाल्यास बलात्काराच्या घटना प्रचंड वाढतील, अशी मुक्ताफळे या पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने  तोडली.

सुरिंदर चौधरी असे या वाचाळ नेत्याचे नाव असून, तो पक्षाच्या सर्वेसर्वा मेहबुबा मुफ्ती यांच्या अतिशय जवळचा मानला जातो. तिरंग्याचा अपमान केल्यामुळे स्वकीयांनी यापूर्वीच दणका दिला होता. आता या नेत्याच्या वादग‘स्त वक्तव्यामुळे मेहबुबांच्या अडचणी आणखी वाढणार आहेत. 

जम्मूला समृद्ध अशी डोगरा संस्कृती लाभली आहे. या देशाकरिता आम्ही देखील त्याग केला आहे. विशेषत: आसाम आणि महाराष्ट्रातील लोकांनी येथे जमिनी घेतल्यास, केवळ बलात्काराच्याच घटना वाढणार नाही, तर आमच्या लोकांचे रोजगारही हिरावले जातील. त्यामुळे बाहेरच्या कुणालाही येथे स्थायी होण्यास आमचा विरोध आहे, अशी बडबड त्याने केली.

 आज जम्मूची ओळख अतिशय शांत प्रदेश म्हणून आहे, महिला सुरक्षित आहेत. उत्तरप्रदेशातील फरिदाबाद आणि हाथरसच्या घटना सर्वांनाच माहीत आहे. अशा घटना आमच्या येथे घडायला नको. बाहेरचे हे लोक येथे आल्यानंतर जम्मूत बलात्काराच्या घटना नक्कीच वाढतील, असे त्याने एका इंग‘जी वृत्तवाहिनीला सांगितले.