कोरोना बाधित रुग्णांमध्ये घट , १२ रुग्णांचा मृत्यू

October 28,2020

नागपूर : २८ ऑक्टोबर - राज्याच्या उपराजधानीत गेल्या तीन दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांमध्ये घट झाली असून गेल्या २४ तासात ३४२ बाधित रुग्ण आढळले असून ४५८ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहे. तर १२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बाधितांची संख्या ९४५७५ वर  पोहोचली आहे. 

कोरोना मुक्त रुग्णाची संख्या ८६७५१ वर पोहोचली आहे तर रिकव्हरी रेट ९१.७३ टक्के आहे. आज १२ रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यात ६ रुग्ण शहरातील, ३ रुग्ण ग्रामीण भागातील तर ३ रुग्ण इतर जिल्ह्यातील आहेत. एकूण मृत्युसंख्या ३०९७ झाली आहे. दिवसभरात ५४६४ चाचण्या झाल्या आहेत. सध्या नागपुरात ४७२७ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.