दोन दुचाकींच्या अपघातात दोन्ही दुचाकीस्वारांचा मृत्यू , मागे बसलेलेही गंभीर जखमी

October 28,2020

वर्धा : २८ ऑक्टोबर - ईसापूर शिवारात माँ की रसोई या ढाब्या जवळ 27 रोजी रात्री दोन दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात दोन्ही दुचाकीस्वरांचा मृत्यू झाला तर दोन्ही वाहनाच्या मागील सीट वर बसणारे जबर जखमी झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, ऋषिकेश दिनकर खैरकार (22) रा. चिंचाळा हे एम यच 32 - 9498 क्रमांकाच्या दुचाकीने इसापूर येथील मित्र संतोष खंडारे (४०), सीताराम वगारे यांच्यासह देवळी कडे येत असताना मागून येण्याऱ्या MH 32 AL 9810 क्रमांकाच्या दुचाकीला जबरदस्त धडक दिली. यात मागून धडक देणारी दुचाकी चालक निलेश सोनी (30) रा.कारला रोड, वर्धा हा चालवीत होता तर त्याच्यासोबत अमोल ब्राह्मने रा. स्टेशन फैल वर्धा हा मागच्या सीट वर बसलेला होता. हे दोघेही कळंब वरून वर्धेकडे बेजवाबदारीपूर्ण भरधाव वेगाने येत होते असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.

 या अपघाता मध्ये पाचही लोकांना जबर मार लागला. स्थानिक लोकांनी जखमींना ग्रामीण रुग्णालयात भरती केले. निलेश सोनी व ऋषिकेश खैरकार यांना जबर मार लागल्यामुळे उपचारा दरम्यान दोघांचा मृत्यू झाला. संतोष खंडारे (40) रा.ईसापूर यांचे तक्रारीवरून देवळी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास देवळी पोलिस करीत आहे.

विशेष बाब म्हणजे इसापूर हे गाव संचारबंदी नंतर अपघात प्रवण स्थळ म्हणून प्रसिद्ध होत आहे.