महाराष्ट्र शासन आता होते आहे प्रतिगामी : प्रकाश आंबेडकर

October 17,2020

मुंबई, 17 ऑक्टोबर : महाराष्ट्र शासन पुरोगामीत्व आणि निर्णय क्षमतेसाठी ओळखले जाते. पण ते हळूहळू प्रतिगामी होताना दिसत आहे. केंद्राने लॉकडाऊन उठवण्यासाठी दिलेल्या दिशानिर्देश महाराष्ट्र शासन मान्य करायला तयार नाही. ज्याप्रकारे इतर राज्यांनी मंदिर आणि आर्थिक केेंद्र चालू करून अर्थव्यवस्थेला गती दिली, परंतु महाराष्ट्र शासन त्या दृष्टीने काहीही पावले उचलत नाही. उलट बेभरवशावरच ठेवलेेले आहे. असे एकंदरीत दिसत आहे. असे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटद्वारे महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे. ज्यामध्ये त्यांनी एक व्हिडीओ देखील जोडला आहे. या व्हिडिओत ते म्हणतात की, महाराष्ट्र शासन हे पुरोगामी शासन, आता ते हळूहळू प्रतिगामी व्हायला लागले आहे. कोरोना लॉकडाऊन उठवतांना केेंद्राने अनेक दिशानिर्देश दिले. परंतु महाराष्ट्र शासन त्यांना मान्य करायलाच तयार नाही. आरोग्य सेतूचे अ‍ॅप आले. त्यातून लोकांची तब्येत कशी आहे हे कळते. कोरोनाबाधित आहे की नाही हे कळते. परंतु महाराष्ट्र शासनाने अजूनही लॉकडाऊन उठवला नाही, अशी परिस्थिती आहे. कदाचित या व्हिडिओनंतर उठवतील अशी परिस्थिती आहे.

तसेच, इतर राज्यांमध्ये सुद्धा मी फिरतो आहे. इतर राज्यांनी मंदिर उघडली. तिथला व्यवसाय व भक्तांसह दोघांचीही सांगड घातली. परंतू अजूनही महाराष्ट्र शासन मंदिरं उघडायला तयार नाही, अशी परिस्थिती आहे. दुसर्‍या बाजूस इतर राज्यांनी आर्थिक घडामोडी सुरू केल्या आहेत. परंतु महाराष्ट्र शासन त्यादृष्टीने काहीही पावलं उचलत नाही. उलट बेभरवशावरच ठेवलेले आहे. असे एकंदरीत दिसत आहे. महाराष्ट्र शासनाने पुरोगामीत्व व निर्णय घेणारे राज्य असे पुन्हा उभे करावे ही विनंती असल्याचेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.