अध्यात्म हा भारताचा विचार ः डॉ. मनमोहन वैद्य

October 17,2020

नागपूर, 17 ऑक्टोबर : भारताचा विचार अध्यात्मावर आधारित असून तो देशाचा एक विचार आहे. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे. त्यामुळे हा विषय केवळ भाषणापुरता मर्यादित न राहता तो जीवनात प्रत्यक्षात आणला पाहिजे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसहकार्यवाह मनमोहन वैद्य यांनी व्यक्त केले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विदर्भ प्रांताच्यावतीने आयोजित कार्यक्रमात वैद्य हे भारत को मानो, भारत को जानो, भारत के बनो, भारतो बनाओ या विषयावर बोलत होते. भारतामध्ये विविध जाती धर्म, पंथाच्या विचारांची माणसे आहे. आणि प्रत्येकामध्ये इश्‍वरांचा अंश आहे. भारताने कर्मयोग, भक्तीयोग व ज्ञानयोग सांगितला आहे. आणि प्रत्येकाला मार्ग स्वीकारण्याचा अधिकार आहे. विविध धर्म परंपरा भारताला लाभलेली आहे आणि त्याची उपासना पद्धतीने वेगळी असली तरी ती भारताने स्वीकारली आहे. भारत हे संपन्न राष्ट्र आहे असून विश्‍व व्यापाराचा सहभाग जास्त होता. विज्ञानाच्या क्षेत्रासोबत आयुर्वेद आणि योग जगाने स्वीकारले आहे. संपूर्ण भारत श्रद्धेच्या एकतेचा भाव आहे. येथे तीर्थयात्रेची परंपरा आहे. कुंभमेळ्यासाठी लाखो लोक एकत्र येत असतात. भाषा वेगळी असली तरी मूल्यवस्था एक आहे असेही वैद्य यांनी म्हटले.