रेल्वे सुरक्षा दलाने केली तिकिटांचा काळाबाजार करणार्‍यांवर कारवाई

October 17,2020

नागपूर, 17 ऑक्टोबर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील रेल्वे सुरक्षा दलाने रेल्वेच्या ई-तिकिटांचा काळाबाजार करणार्‍यांविरुद्ध धडक कारवाई केली. नागपूर शहरातील चौघांसह विभागांतून एकूण सहा दलालांना अटक करण्यात आली आहे.

संदेश जैन रा. महावीर पॅलेस, लकडगंज नागपूर, मोहम्मद नौशाद सादिक रा. यशोधरानगर, मोहम्मद सलीम जाकीर हुसैन रा. सादिकाबाद यशोधरानगर अशी आरोपींची नावे आहेत. याशिवाय भंडारा व गोंदिया येथून प्रत्येकी एका दलालाला अटक करण्यात आली आहे. रेल्वेकडून अलीकडे विशेष रेल्वेगाड्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांची संख्या वाढली आहे. सणासुदीच्या दिवसांमध्ये प्रवासी संख्या आणखीच वाढणार आहे. संधीचा लाभ घेण्यासाठी दलालही सक्रिय झाले आहेत. त्यांच्याकडून आधीच तिकिटांची खरेदी केली जात असल्याने गरजू प्रवाशांना अधिकचा खर्च करावा लागतो. ही बाब लक्षात घेता आरपीएफने तिकिटांचा काळाबाजार करणार्‍यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे. इतवारीतील पथकाने अटक केलेल्या संदेशकडून 12 हाजर 187 रुपये किंमतीच्या 8 तिकिट, रक्षकाकडून 13 हजार रुपये किंतमीच्या 14 तिकिट, मोतीबाग पथकाने अटक केलेल्या नौशदकडून 9 तिकिट, सलीमकडून 29 हजार 548 रुपय किंमतीच्या 14 तिकिट हस्तग करण्यात आल्या आहेत.