अजनीत साठवलेली शस्त्र जप्त; दोन तरुण अटकेत

October 17,2020

नागपूर, 17 ऑक्टोबर : गुन्हे शाखा युनिट 4 चे पथक पेट्रोलिंगवर असताना त्यांना माहिती मिळाली की, अजनी हद्दीतील अजनी परिसरातील दोन तरुणांकडे मोठ्या प्रमाणात घातक शस्त्रे साठवून ठेवली आहेत. त्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी दोन तरुणांना ताब्यात घेतले, त्यांच्याकडून चाकूसह तलवार असा शस्त्रसाठा जप्त करीत होणार्‍या संभावित घटनेस प्रतिबंद घातला आहे.

प्रतीक फुलझेले रा. ओंकारनगर व कार्तिक शर्मा रा. हावरापेठ असे आरोपींची नावे आहेत. आरोपींना ताब्यात घेत त्यांच्याकडून लोखंडी तवार व चाकूसह 10 प्राणघातक शस्त्र जप्त केले. सदर आरोपींची कसून चौकशी केली असता, त्यापैकी आरोपी कार्तिक शर्माने सांगितले की,त्याचा भाऊ रजत जो सध्या विजय मोहड याच्या खुनाच्या गुन्ह्यात कारागृहात आहे. त्याने कारागृहात जाण्याच्या सहा महिन्यांपूर्वी कार्तिकककडे हा शस्त्रसाठा ठेवण्यासाठी दिला होता. यातील आरोप कार्तिकवर शहरातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये खुनासह दरोडा, दुखापत, जुगार असे 7 गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपींना अटक करून त्यांच्याकडून सदर शस्त्रसाठा जप्त करून होणारी संभावित गंभीर घटनेत प्रतिबंध केला आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे अप्पर पोलिस आयुक्त सुनील फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे.