रुळ ओलांडणार्‍या मजुराचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू

October 17,2020

नागपूर, 17 ऑक्टोबर : रात्री जेवण केल्यानंतर रुळ ओलांडून लेबर बॅरेकमध्ये झोपण्याकरिता जात असलेल्या लेबरचा भरधाव रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना सोनेगाव पोलिस ठाण्यातंर्गत एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना नागपूरच्या मानकापूर पोलिस ठाण्यातंर्गत घडली.

अनुजकुमार हरिविलाससिंग यादव हा लेबर म्हणून कार्यरत होता. दुसर्‍या घटनेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मानकापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ताजनगर झोपडपट्टी, इंदिरा माता नगर, नागपूर येथे राहणारा राजेश रवतेल याचा घराजवळून जाणार्‍या नागपूर-दिल्ली रेल्वेलाइन येथे रेल्वेची धडक लागली. यात तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचाराकरिता मेयो इस्पितळात नेले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पुढील कारवाई सुरु आहे.