मास्क न लावणा-या २४५ नागरिकांकडून १ लाखाचा दंड वसूल

September 30,2020

 नागपूर : ३० सप्टेंबर -   नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी आज  मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार २४५ नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे १ लक्ष २२ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही दिवसात शोध पथकांनी ९०८६ नागरिकांविरुध्द कारवाई करुन रु. २९,०२,०००/- चा दंड वसूल केला आहे.

 लक्ष्मीनगर झोन अंतर्गत ५६, धरमपेठ झोन अंतर्गत ५०, हनुमाननगर झोन अंतर्गत २०, धंतोली झोन अंतर्गत २२, नेहरुनगर झोन अंतर्गत १८, गांधीबाग झोन अंतर्गत १४, सतरंजीपूरा झोन अंतर्गत १७, लकडगंज झोन अंतर्गत १५, आशीनगर झोन अंतर्गत १४, मंगळवारी झोन अंतर्गत १४ आणि मनपा मुख्यालयात ५ जणांविरुध्द बुधवारी ही कारवाई शोध पथकाचे प्रमुख विरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. ५०० रुपये प्रमाणे आतापर्यंत ३६१६ बेजबाबदार नागरिकांकडून रु १८ लक्ष ८ हजार वसूल करण्यात आले आहे.