२५००० हजाराची लाच मागण्याप्रकरणी महिला व बालकल्याण अधिकाऱ्यावर गुन्हा, पर्यवेक्षक अटकेत

September 30,2020

अकोला : ३० सप्टेंबर - फाईल प्रलंबित ठेवून २५००० ची लाच मागणाऱ्या तत्कालीन महिला व बालकल्याण अधिकाऱ्यावर या प्रकरणी गुन्हा दाखल करून पर्यवेक्षकास अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. तत्कालीन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी योगेश जवादे आणि पर्यवेक्षक अधिकारी गौतम करू आरवेल यांनी अनुदान प्रस्ताव योग्य असतानाही तो मंजुरीसाठी पुणे आयुक्त कार्यालयात पाठविण्यासाठी अडीच लाख रुपयांची लाच मागीतली. तक्रारदार यांच्या संस्थेच्या सण 2018 ते 19 चा अनुदान प्रस्ताव 14 लाख 50 हजार रुपयांचा अहवाल योग्य असताना पुणे आयुक्त कार्यालयात वेळेत न पाठविता तो प्रलंबित ठेवला.

तत्कालीन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी योगेश जवादे याने आरवेल याच्यामार्फत स्वतः च्या मोबाईल संभाषणाद्वारे आर्थिक लाभासाठी अडीच लाख रुपयांची मागणी तक्रारदारांना केली होती. याबाबत अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 18 जून ते 21 ऑगस्ट दरम्यान तक्रारदार व संशयितांच्या संभाषणाची पडताळणी केली. यावरून एसीबीने तक्रारदारांच्या तक्रारीवरून या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई एसीबीचे पोलीस उपअधीक्षक एस. एस. मेमाणे यांनी त्यांच्या चमुसह केली आहे.