नितीन गडकरी कोरोनामुक्त

September 30,2020

नागपूर : ३० सप्टेंबर - केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी करोनामुक्त झाले आहेत. दोन आठवड्यांपूर्वी नितीन गडकरी यांना करोना व्हायरसची लागण झाली होती. स्वत: नितीन गडकरी यांनी आज त्यांच्या टि्वटर अकाऊंटवरुन करोनामुक्त झाल्याची माहिती दिली आहे.

“तुमच्या सर्वांचे आशीर्वाद आणि शुभेच्छांच्या बळावर मी करोनामधून पूर्णपणे बरा झालो आहे” असे नितीन गडकरी यांनी त्यांच्या टि्वटमध्ये म्हटले आहे.

दोन आठवड्यांपूर्वी नितीन गडकरी यांनी स्वत: ट्विट करत आपल्याला करोनाची लागण झाली असल्याची माहिती दिली होती. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर नितीन गडकरी स्वत:चं विलगीकरणात गेले होते. त्यावेळी त्यांनी  संपर्कात आलेल्यांना चाचणी करण्याचं आवाहन केलं होतं.