गोंदियात प्लाझ्मा मशीन परवाना नसल्याने बंद

September 30,2020

गोंदिया : ३० सप्टेंबर - जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्याचप्रमाणे कोरोनावर मात करून बरे होणाऱ्यांचे प्रमाणही अधिक आहे. बरे झालेले रुग्ण प्लाझ्मा दान करण्याच्या प्रतिक्षेत आहेत. मात्र, गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्लाझ्मा मशीन परवाना नसल्याने बंद आहे. त्यामुळे, रुग्णांच्या नातेवाईकांना मशीन असूनसुद्धा प्लाझ्मासाठी धडपड करावी लागत आहे.

गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्लाझ्मा मशीनला अन्न व औषध विभागाकडून परवाना मिळालेला नाही. त्यामुळे, मशीन उपलब्ध असून सुद्धा ती निकामी आहे. कोरोना रुग्णांना प्लाझ्माची गरज असल्यास त्यांचे नातेवाईक प्लाझ्मासाठी इकडे तिकडे भटकत असतात. मात्र, गोंदियात मशीन असून सुद्धा रुग्णांना मदत होत नाही. त्यामुळे, प्लाझ्मा मशीन केव्हा सुरू होणार? असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.