अनुराग कश्यपला पोलिसांकडून चौकशीसाठी समन्स

September 30,2020

मुंबई : ३० सप्टेंबर - बॉलिवूड चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप  याला वर्सोवा पोलिस स्थानकातून चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आला आहे. अभिनेत्री पायल घोषने दाखल केलेल्या लैंगिक शोषण तक्रारीनंतर अनुरागला मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी बोलवले आहे. या प्रकरणी अनुरागला १ ऑक्टोबर रोजी, सकाळी ११ वाजता वर्सोवा पोलिस स्थानकात चौकशीसाठी हजर राहायचे आहे.

बॉलिवूड अभिनेत्री पायल घोषने दिग्दर्शक अनुराग कश्यप  विरोधात लैंगिक छळाची तक्रार दाखल केली होती. तक्रार दिल्यानंतरही पोलिसांकडून कोणतीच कारवाई न झाल्याने पायलने  राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान, तिला न्याय मिळेल आणि त्यासाठी आपण सर्वतोपरी मदत करू, असे आश्वासन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी दिले होते.