सुशांतचा मृत्यू विष प्राशनाने नाही - एम्सचा अहवाल

September 30,2020

मुंबई : ३० सप्टेंबर - सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सध्या सीबीआय करत आहे. सुशांतने आत्महत्या केली नसून त्याची हत्याच झाल्याचा दावा अनेकांकडून करण्यात येत आहे. सुशांतने आत्महत्या केल्याचे मुंबई पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले होते. सुशांतच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्येही सुशांतचा मृत्यू श्वास गुदमरून झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्याच्या व्हिसेरा रिपोर्टमधूनही सुशांतच्या शरीरात कोणत्याच प्रकारचे केमिकल किंवा विष सापडले नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. अशातच सोमवारी रात्री उशिरा एम्सच्या फॉरेन्सिक टीमने सीबीआयडे यासंदर्भातील आपला अहवाल सोपावला आहे. एम्सने दिलेल्या अहवालातून असा दावा करण्यात आला आहे की, सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू विष प्राशन केल्यामुळे झालेला नाही.

एम्सच्या अहवालात सांगण्यात आले आहे की, सुशांतच्या शरीरात कोणत्याही प्रकारचे केमिकल्स किंवा विष आढळून आलेले नाही. तसेच एम्स रुग्णालयातील फॉरेन्सिक टीमने कूपर रुग्णालयाच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टवर प्रश्नही उपस्थित केले आहेत. आता सीबीआय एम्सने दिलेल्या या अहवालाच्या आधारे आपल्या तपासाची पुढची दिशा ठरवणार आहे.