नागपुरात पकडले इराणी चेन स्नॅचर्स

September 28,2020

नागपूर :  २८ सप्टेंबर - मागील काही दिवसांपासून शहरात उच्छाद मांडणाऱ्या ‘इराणी चेन स्नॅचर्स’च्या गुन्हे शाखा पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. चेन, मंगळसूत्रासारखे दागिने पळवणाऱ्या या चोरांना अटक झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वाश: टाकलाआहे. मागील काही दिवसांपासून नागपूर शहरात गळ्यातली चेन, मंगळसूत्र पळवणारी इराणी टोळी सक्रीय झाली होती. कसलीही भीती न बाळगता ही टोळी दिवसाढवळ्या चोरी करायची. त्यांच्या दहशतीमुळे नागपूरकर पुरते भेदरले होते.

इराणी चेन स्नॅचर्स  महिलांचे दागिने पळवताना दोन गाड्यांचा वापर करायचे. रस्त्यावर कार किंवा दुचाकी घेऊन फिरायचे. एखादी व्यक्ती किंवा महिला दागिने घातलेली दिसली, की त्यांची तयारी सुरु व्हायची. दोघे दुचारकीवर तर बाकीची टोळी कारमध्ये बासून कार दागिने घातलेल्या व्यक्तीसमोर चालवाची. दुचाकीवर बसलेल्या चोराने चेन पळवली, की तो समोरच्या कारमध्ये जाऊन कापडे बदलायचा. जेणेकरुन कपडे बदलल्याने सीसीटीव्ही फुटेजमधून ओळख पटणार नाही.पण, नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने या अट्टल चेन चोरांना पकडल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे.

दरम्यान, या इराणी चोरामुळे नागरिक पुरते घाबरले होते. शहरातील चेन स्नॅचिंगच्या अनेक तक्रारी आल्यानंतर पोलिसांनी या चोरांना पकडन्यासाठी सापळा रचला. आणि बड्या शिताफीने गुन्हे शाखेने त्यांना पकडले. पोलिशी खाक्या दाखवल्यानंतर आताप्रर्यंत चोरांनी असे 25 विविध गुन्हे केल्याचे कबुल केले आहे.