नागपूर शहरात संविधान चौकात केली नागपूर कराराची होळी

September 28,2020

नागपूर : २८ सप्टेंबर - विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने आज संपूर्ण विदर्भभर जिल्हा व

तालूका स्तरावर नागपूर करार जाळा आंदोलन जाहीर करण्यात आले होते त्या

अंतर्गत नागपूर शहर विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने आज दुपारी 1

वा. संविधान चौक, नागपूर येथे नागपूर कराराची होळी करून महाराष्ट्र

सरकारचा निषेध केला तर स्वतंत्र विदर्भ राज्याच्या प्रचंड घोषणाबाजी करून

मागणी करण्यात आली.

एका बॅनरवर नागपूर करार लिहून व नागपूर कराराच्या प्रती बॅनर सहीत

प्रचंड घोषणाबाजी करून नागपूर करार जाळण्यात आला. “नागपूर कराराचा

निषेध असो”, स्वतंत्र विदर्भ राज्य झालेच पाहीजे, आमचे राज्य - विदर्भ राज्य

आदी घोषणाबाजीने संविधान चौक दणाणून गेले होते.

28 सप्टेंबर 1953 साली नागपूर कराराने विदर्भाला महाराष्ट्रात विलीन

करून महाराष्ट्र तयार झाले. तेव्हापासूनच विदर्भावर अन्याय सुरू झाला.

विदर्भातील वीज, पाणी, कोळसा, मँगनीज, लोखंड सह 23 प्रकारच्या खनिज

संपत्तीचा शोषण करून विदर्भाला नागविले व पश्‍चिम महाराष्ट्र समृद्ध केले.

नागपूर करारातील एकही कलम न पाळता विदर्भाचे फक्त आणि फक्त शोषण

करून बळी दिला.

नागपूर विभागीय अध्यक्ष मुकेश मासुरकर यांनी छोटेखानी भाषणात

सांगीतले की, नागपूर करार म्हणजे विदर्भाला गुलाम करणारा, नागपूर करार

म्हणजे विदर्भाचे स्वातंत्र्य हिरावून नेणारा, विदर्भाला बेरोजगार करणारा,

विदर्भाची संपन्नता छिनणारा करार आहे. महाराष्ट्रवाद्यांनी विदर्भाचे शोषण

करून पश्‍चिम महाराष्ट्र समृद्ध झाला म्हणून त्या कराराची आम्ही होळी

करतो. आम्हास आता महाराष्ट्रात राहायचे नाही. स्वतंत्र विदर्भ राज्य घेतल्या

शिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असेही मुकेश मासुरकर यांनी सांगीतले.


या आंदोलनात मुकेश मासुरकर, रेखाताई निमजे, विष्णू आष्टीकर, सुयोग

निलदावार, नितीन अवस्थी, सुनिता येळणे, जे.एस. ख्वाजा, रविंद्र भामोडे, गणेश

शर्मा, प्रिती दिडमुठे, ज्योती खांडेकर, प्रशांत मुळे, गुलाबराव धांडे, तात्यासाहेब

मत्ते, रामेश्‍वर मोहबे, शोभा येवले, नौशाद हुसेन, राजेंद्र सतई, नरेश निमजे,

अण्णाजी राजेधर, राजेश बंडे, जिवन रामटेके, रामभाऊ कावडकर, रजनी शुक्ला,

अशोक नेवले, विजय मौदेकर, माधुरी चौव्हाण, अनिल वाटकर, जया चातूरकर,

मधुकर बाळपांडे, खुशाल शेंडे, अशफाक रहमान, शिरीष शनेश्‍वर, सुरेश निनावे,

शुभम खांडेकर, कृष्णा मोहबिया, शुभम पौनीकर, चंद्रशेखर बदकुले, विभा शुक्ला,

राम आखरे आदी बरेच कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.