नागपुरात कोरोना परतीच्या मार्गावर, बाधितांची संख्या घटली तर कोरोनमुक्त रुग्णसंख्या वाढली

September 28,2020

नागपूर : २८ सप्टेंबर - राज्याच्या उपराजधानीत कोरोनाचा कहर सुरु असला तरीही मागील काही दिवसांपासून कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ही  बाधित रुग्णांपेक्षा जास्तच येत आहे. आज नागपुरात ८६२ नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत तर १४३१ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. आज शहरात ३० कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण २४१३ कोरोना बाधित रुग्णांचा नागपूर शहरात कोरोना मुळे  बळी गेला आहे. 

कोरोना नागपूर शहरात धुमाकूळ घालत असून कोरोना मुळे  धास्तावलेल्या जनतेला काही अंशी दिलासा मिळत आहे. आज एकूण ८६२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यामुळे एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ७५६८३ वर पोहोचली आहे. तर आज एकूण १४३१ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत एकूण कोरोनामुक्त  झालेल्या रुग्णांची संख्या ५९६९७ वर पोहोचली आहे. तर कोरोना मुक्त होण्याची टक्केवारी ७८.८८ टक्के इतकी झाली आहे. आज आलेल्या ८६२ बाधितांपैकी २४७ ग्रामीण भागातील, ६११ शहरातील तर ४ जिल्ह्याबाहेरील रुग्ण आहेत. 

सद्यस्थितीत नागपूर शहरात १३५७३ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत असून त्यात ३५८१ ग्रामीण भागातील तर ९९९२ शहरातील रुग्ण आहेत.