अकोल्याच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांचे पती डॉ. इंदुप्रकाश गजभिये यांचे कोरोनाने निधन

September 27,2020

नागपूर  : २७ सप्टेंबर -  अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांचे पती डॉ. इंदुप्रकाश गजभिये (७१) यांचे कोरोणामुळे रविवारी,27 सप्टेंबर रोजी दु.3 च्या सुमारास अकोल्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात निधन झाले. डॉ. इंदुप्रकाश हे माजी वैद्यकीय अधिकारी होते. राज्याच्या विविध वैद्यकीय महाविद्यालयामध्ये त्यांनी सेवा दिली. वयाच्या ५८ व्या वर्षी नागपूरच्या आयजीएमसीमधून ते सेवानिवृत्त झाले. त्यांच्या पश्चात पत्नी डॉ. मीनाक्षी, मुलगा डॉ. अनुज, मुलगी डॉ.द्रुमदलक असा आप्त परिवार आहे.