कोरोनाकाळात स्थलांतरासाठी एक कोटी मजुरांचा पायी प्रवास

September 24,2020

नवी दिल्ली : २४ सप्टेंबर - कोरोना लॉकडाउनदरम्यान सुमारे एक कोटी मजुरांनी पायी प्रवास केला. महामार्गांवरुन चालत जाणार्या मजुरांची वाहतूक करण्यासाठी सरकारने सोय केल्याची माहिती रस्ते परिवहन राज्यमंत्री व्ही. के . सिंह यांनी लोकसभेत दिली. 

या मजुरांच्या खाण्यापिण्याची, औषधांची आणि चप्पलांची व्यवस्थाही सरकारने केल्याचेही ते म्हणाले. या मजुरांना आर्शय देण्यासाठी जागेची व्यवस्थाही केंद्र सरकाने केली आणि अनेक ठिकाणी स्थानिक प्रशासनाने या मजुरांना घरी पोहचवण्याची व्यवस्था केल्याचेही सिंह आपल्या उत्तरात सांगितले. गृह मंत्रालयाने २९ एप्रिल २0२0 आणि १ मे २0२0 रोजी दिलेल्या आदेशानंतर या मजुरांच्या प्रवासासाठी विशेष बस आणि र्शमिक ट्रेन्सची व्यवस्था करण्यात आली. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने २४ मार्च रोजी देशभरामध्ये लॉकडाउनची घोषणा केली. अवघ्या काही तासांची मुदत देत लॉकडाउनची घोषणा करण्यात आल्याने स्थलांतरित मजुरांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. अनेकजण रोजगार गमावल्याने चालतच स्वत:च्या मूळ राज्यात निघाल्याचे चित्र पहायाला मिळाले. किती मजुरांनी स्थलांतर केले यासंदर्भातील माहिती आपल्याकडे नसल्याचे केंद्राने आधी सांगितले होते. मात्र आता सरकारने मार्च ते जून महिन्यामध्ये एक कोटी स्थलांतरित मजूर पायी प्रवास करत आपल्या मूळ राज्यात पोहचल्याचे सांगितले आहे. मात्र या कालावधीमध्ये किती स्थलांतरित मजुरांचा मृत्यू झाला याबद्दलची माहिती सरकारने दिलेली नाही.

रस्ते परिवहन राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांनी लोकसभेमध्ये दिलेल्या लेखी उत्तरात कोरोनामुळे मोठ्या संख्येत स्थलांतरित प्रवासी आपल्या मूळ राज्यांमध्ये परतल्याचे सांगितले आहे. कामगार आणि रोजगार मंत्रालयाने आतापयर्ंत जी माहिती गोळा केली आहे त्याप्रमाणे जवळजवळ एक कोटी सहा लाख स्थलांतरित मजूर लॉकडाउनच्या कालावधीमध्ये चालत दुसर्या राज्यातून आपल्या मूळ राज्यात चालत गेले असे दिसून आले आहे.

व्ही. के. सिंह यांनी सभागृहाला दिलेल्या माहितीनुसार आतापयर्ंत जी माहिती गोळा करण्यात आली आहे त्यानुसार मार्च ते जून २0२0 दरम्यान ८१ हजार ३८५ रस्ते अपघातांची नोंद झाली आहे. यामध्ये २९ हजार ४१५ लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र लॉकडाउनच्या कालावधीमध्ये रस्ते अपघातामध्ये मरण पावलेल्या स्थलांतरित मजुरांचा वेगळी आकडेवारी मंत्रालयाने ठेवलेली नाही असेही सिंह यांनी स्पष्ट केले. केंद्राकडून वेळोवेळी राज्य सरकार तसेच केंद्रशासित प्रदेशांना सूचना जारी करुन स्थलांतरित मजुरांची काळजी घेण्यासंदर्भात सांगण्यात आले होते. या मजुरांच्या राहण्याची तसेच खाण्याची आणि आरोग्यासंदर्भातील सेवेची योग्य ती काळजी घ्यावी असेही केंद्राने सांगितल्याचे सिंह यांनी म्हटले आहे. हायवेवरुन चालत जाणार्या मजुरांची वाहतूक करण्यासाठी सरकारने सोय केल्याची माहितीही रस्ते परिवहन राज्यमंत्र्यांनी दिली. या मजुरांच्या खाण्यापिण्याची, औषधांची आणि चप्पलांची व्यवस्थाही सरकारने केल्याचे सांगण्यात आले. 

सरकारने केली मजुरांची व्यवस्था

मजुरांना आर्शय देण्यासाठी जागेची व्यवस्थाही केंद्र सरकाने केली आणि अनेक ठिकाणी स्थानिक प्रशासनाने या मजुरांना घरी पोहचवण्याची व्यवस्था केल्याचेही सिंह आपल्या उत्तरात सांगितले. गृह मंत्रालयाने २९ एप्रिल २0२0 आणि १ मे २0२0 रोजी दिलेल्या आदेशानंतर या मजुरांच्या प्रवासासाठी विशेष बस आणि र्शमिक ट्रेन्सची व्यवस्था करण्यात आली.