टाइम मॅग्झिनच्या प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत नरेंद्र मोदी

September 24,2020

वॉशिंग्टन : २४ सप्टेंबर - अमेरिकेच्या प्रसिद्ध टाइम मॅग्झिनने जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह समावेश करण्यात आला आहे. या यादीत असलेल्या भारतीय व्यक्तींमध्ये अभिनेता आयुष्मान खुराना, गुगलचे मु‘य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचई, एचआयव्हीवर संशोधन करणारे रवींद्र गुप्ता आणि शाहीनबाग आंदोलनात भाग घेणार्या बिल्किसच्या नावाचाही समावेश आहे.

टाइम मॅग्झिनकडून दरवर्षी ही यादी जाहीर केली जाते. यात वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करताना जगाला प्रभावित करणार्या लोकांचा समावेश केला जातो. पंतप्रधान मोदी या यादीत एकमेव भारतीय नेते आहेत. यावेळी जवळपास 24 नेत्यांचा नेत्यांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे. लोकशाहीसाठी केवळ स्वतंत्र निवडणुकाच महत्त्वाच्या नाहीत. यात केवळ कुणाला अधिक मते मिळाली हे समजते. मात्र, याहून अधिक महत्त्व, ज्या लोकांनी विजेत्याला मतदान केले नाही, अशांच्या अधिकाराचे आहे. भारत 7 दशकांहूनही अधिक काळ जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. भारताच्या 1.3 अब्ज लोकसं‘येत ख्रिश्चन, मुस्लिम, शीख, बौद्ध, जैन आणि इतर धर्माच्या लोकांचाही समावेश आहे, असे टाइम मॅग्झिनने म्हटले आहे.

यापूर्वी टाइम मॅग्झिनने आपल्या एका लेखात पंतप्रधान मोंदींचे कौतुक केले होते. या मॅग्झिनने ‘मोदी हॅज युनायटेड इंडिया लाइक नो प्राईम मिनिस्टर इन डिकेड्स’ अर्थात् मागील काही दशकांत कुठल्याही पंतप्रधानाने केले नसेल, असे मोदींनी भारताला एकजूट केले,’ या मथळ्याखाली मोठा लेख छापला होता. हा लेख मनोज लडवा यांनी लिहिला आहे. लडवा यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी ‘नरेंद्र मोदी फॉर पीएम’ अभियानही राबवले होते. यात मोदींच्या सामाजिक विकासाच्या धोरणाने भारतीयांना गरिबीतून बाहेर काढले आहे. यात, हिंदू आणि अल्पसं‘यकांचाही समावेश आहे. हे कार्य, गेल्या कोणत्याही पिढीच्या तुलनेत अत्यंत वेगाने झाले आहे,’ असे म्हटले होते.

 पंतप्रधान मोदींशिवाय या यादीत, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग, तैवानच्या राष्ट्राध्यक्ष त्साई इंग वेन, जर्मनीच्या चान्सलर अँजेला मार्केल, जो बिडेन आणि कमला हॅरिस यांच्यासह जगातील अनेक नेत्यांचा समावेश आहे.

 आयुष्मान खुराना हा या यादीत स्थान मिळवणारा एकमेव भारतीय कलाकार आहे. त्याने समाजमाध्यमावर हा मान मिळाल्याची माहिती दिली. यावेळी टाइम मॅग्झिनने जारी केलेल्या जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत स्थान मिळाल्याने अभिमान आहे, असे त्याने लिहिले आहे.