वर्धेत खासदार रामदास तडस यांच्या घरासमोर केले राखरांगोळी आंदोलन

September 24,2020

वर्धा : २४ सप्टेंबर - केंद्र शासनाने अचानक लागू केलेली कांदा निर्यातबंदी सराकरने मागे घ्यावी या मागणिसाठी शेतकरी संघटनेने राज्यव्यापी राखरांगळी आंदोलन केले. आज २४ रोजी खा. रामदास तडस यांच्या घरासमोर शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.

सहा महिने शेतकर्यांनी मातिमोल भवाने कांदा विकला तेव्हा सरकारने शेतकर्यांना कोणतीही मदत केलेली नाही. आता कुठे कांद्याला चांगले भाव मिळू लागले तर सराकरने अचानक कांदा निर्यात बंद करुन शेतकर्यांचा विश्वासघात केला आहे. सरकारने नुकतेच शेती व्यापाराला स्वातंत्र्य देणारे विधेयक मंजुर केले आहे. शेतकरी कुठेही आपला माल विकू शकतो व युद्धा सारख्या आणिबाणिच्या परिस्थितीतच सरकार दर नियंत्रणसाठी हस्तक्षेप करेल असा कायदा केला आसताना सरकारने कांदा निर्यात बंद करून स्वताच कायदा मोडला आहे. ग्रहकांना खुश करून बिहारची निवडणुक जिंकण्यासाठी केंद्र शासनाने निर्यातबंदी केली आहे असा आरोप शेतकरी संघटनेचे नेते मधुसुदन हरणे यांनी आंदोलन प्रसंगी केले. कांद्याची निर्यातबंदी करून कांदा उत्पदाकांच्या प्रपंचाची शासनाने राखरांगोळी केली आहे म्हणुन खासदारांच्या दारात निर्यातबंदी आदेश जाळुन त्याची राख करायची व त्यांच्या दारात कांद्याची रांगोळी काढण्याचे राज्यव्यापी आंदोलन शेतकरी संघटनेने केले.

 कांदा निर्यात बंद करून सरकारने शेतकर्यांचे नुकसान तर केले आहेच पण देशाची ढासळती अर्थव्यवस्था सावरण्यासाठी, निर्यातीतून मिळणारे परकीय चलन सुद्धा सरकारने बुडवले आहे. सरकारची ही कृती देशद्रोही आहे असा आरोप आंदोलकांनी केला.

 खासदार हे जनतेचे लोकप्रतिनिधी असून जनतेचे ग्रार्हाणे लोकसभेत मांडून न्याय मिळवून देणे खासदारांचे कर्तव्य आहे. खासदारांना त्यांच्या कर्तव्याची आठवण करुन देण्यासाठी शेतकरी संघटनेने हे राज्यव्यापी आंदोलन पुकारले होते.