शेतकऱ्यांनी जमिनीत गाडून घेत केले समाधी आंदोलन

September 24,2020

बुलढाणा : २४ सप्टेंबर - शेतकर्यांना नुकसानभरपाई मिळण्यासाठी, तसेच नुकसानग्रस्त शेती पिकांचे तत्काळ पंचनामे करावेत, हेक्टरी पंचवीस हजार मदत द्यावी, या मागणीसाठी राज्य सरकारच्या नाकर्तेपणाच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा नेते रविकांत तुपकर व कार्यकर्त्यांनी मोताळा तालुक्यातील परडा शेतशिवारात जमिनीत स्वतःला गाडून घेत अनोखे समाधी आंदोलन केले.

गेल्या महिन्यापासून संततधार पावसाने शेतातील सोयाबीन मूग, उडीद, कपाशी या पिकांची हजारो हेक्टर परिसरात नासाडी झाली. अद्याप शासनाने पश्चिम विदर्भासह बुलढाणा जिल्ह्यात शेती पीक नुकसानीच्या सर्वेक्षणाचे आदेश प्रशासनाला दिले नाहीत. घरी बसून प्रशासन चालविणार्या सत्ताधार्यांमुळे आता आत्महत्या करण्याची वेळ येऊन ठेवली असल्याने आत्मक्लेश समाधी आंदोलन छेडण्यात आले असल्याचे रविकांत तुपकर यांनी स्पष्ट केले आहे.

 या आंदोलनाची दखल घेत उपजिल्हाधिकारी भूषण अहिरे, तहसीलदार व्ही. एम. कुमरे यांनी दोन दिवसांत शेती पिके नुकसानाचे पंचनामे व सर्वेक्षण करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर हे आंदोलन तूर्तास मागे घेण्यात आले. या समाधी आंदोलनात स्वा. शेतकरी संघटनेचे दत्ता पाटील, शेख रफीख शेख करीम, सय्यद वसीम यांनी सुद्धा जमिनीत गाडून घेतले होते. यावेळी संघटनेचे पवनकुमार देशमुख, राणा चंदन, कार्यकर्ते उपस्थित होत