महिलांनी भविष्याचा वेध घेत विक्रीवाढीसाठी आधुनिक माध्यमांचा उपयोग करावा - स्मृती इराणी

September 24,2020

नागपूर : २४ सप्टेंबर - महिलांनी तयार केलेल्या उत्पादने प्रशंसनीय असतात आणि स्थानिक स्तरावर त्याची विक्री  होते. पण आता स्थानिक नव्हे तर भविष्याचा वेध घेत उत्पादन आणि विक्रीतील वाढीसाठी भविष्यातील माध्यमांचा विचार करा आणि दर्जा व आकर्षक किमतीत उत्पादने उपलब्ध करुन द्या, जग तुमचेच आहे असा मोलाचा सल्ला केंद्रीय मंत्री स्मृती इरानी यांनी उद्योजिकांना दिला.

विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनच्या महिला शाखेने उद्योजिक ई-पोर्टल सुरू केले असून या पोर्टलचे लोकार्पण ना. स्मृती इरानी यांच्या हस्ते आभासी पद्धतीने पार पडले. यावेळी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महिला शाखेच्या अध्यक्षा मनीषा बावनकर, प्रकल्प संचालक मधुबाला सिंग, व्हीआयएचे अध्यक्ष सुरेश राठी आदी मान्यवर उपस्थित होते.

 याप्रसंगी स्मृती इरानी यांनी ‘उद्योजकतेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण’ या विषयावर देखील मार्गदर्शन केले. आपल्या सारगर्भ मार्गदर्शनात उद्योजिकांमध्ये फक्त महिलाच येऊ शकतात मात्र उद्योजकतेला कोणतेही बंधन नसावे, ती बाब सर्वांपर्यंत पोहोचायला हवी. विक‘ी देखील महिलांपुरती न ठेवता समाजातील सर्व घटकांपर्यंत ते पोहोचावे हा मु‘य हेतू असावा. उत्पादन बाजारात आणताना दर्जा, गुणात्मकता आणि आकर्षक पॅकेजिंग आणि किंमत या बाबींकडे कटाक्षाने लक्ष द्या. यासोबतच आता तंत्रज्ञान उपलब्ध आहे,

 प्रत्येक उत्पादन आणि त्याच्या विक‘ीपूर्वी त्याचे डिझाईन, लेबल आदींची माहिती वेबसाईटवर टाका आणि लोकांना त्याची माहिती करुन द्या. यासोबतच महिलांनी आपल्या वेबसाईटवर उत्पादनांची आणि विक‘ेत्यांची एक संपूर्ण व्यवस्था उभी करावी असे आवाहन केले. याप्रसंगी मनीषा बावनकर यांनी स्वागतभाषणातून उद्योजिकाचा 24 वर्षाचा प्रवास विशद केला आणि या माध्यमातून महिलांचे काम लोकांपुढे येत असल्याचे सांगितले.

 यावेळी विझक‘ाफ्टचे हिमांशू सुब‘म्हणीयम  अपस्थित होते. याप्रसंगी रश्मी कुळकर्णी यांनी परिचय करुन दिला. कार्यक‘माला सरला कामदार, सरीता पवार, सईदा हक, चित्रा पराते, वाय. रमणी, नीलम बोवाडे, अंजली गुप्ता, अनिता राव, वंदना शर्मा, शचि मलिक, रिता लांजेवार, इंदू क्षीरसागर, शिखा खरे, योगिता देशमुख, पूनम गुप्ता व पूनम लाला आदी पदाधिक़ारी उपस्थित होते.