नार्कोटिक्स प्रकरणात जेष्ठ अभिनेत्रीची चौकशी सुरु

September 24,2020

मुंबई : २४ सप्टेंबर - सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो विभागाकडून तपास सुरू आहे. या तपासादरम्यान जया सहा हिच्या व्हाट्सअप चॅटमध्ये मिळालेल्या माहितीवरून बॉलिवूडमधील काही अभिनेत्रींना एनसीबीने समन्स बजावले आहे. यामध्ये रकुल प्रीत सिंग, सिमॉन खंबाटा, सारा अली खान, अभिनेत्री दीपिका पदुकोण यांचा समावेश आहे. समन्स बजावण्यात आल्यानंतर आज  नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो च्या कार्यालयामध्ये सीमोन खंबाटा हजर झालेली आहे. 

या प्रकरणात नाव आलेल्या रकुल प्रीत सिंह हिच्या पीआर टीमकडून मात्र, रकुल प्रीत सिंहला या संदर्भात कुठल्याही चौकशीसाठीचे समन्स अद्याप मिळालेले नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे रकुल प्रीत सिंग ही एनसीबी समोर चौकशीसाठी कधी हजर होणार? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, एनसीबीने रकुल प्रीत सिंगलाही समन्स बजावली असल्याची माहिती दिली.

दुसरीकडे सारा अली खान आणि दीपिका पदुकोण यांना एनसीबीकडून समन्स मिळाल्याचे सांगण्यात येत असल्यामुळे त्यांनाही या चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. 25 सप्टेंबरला सारा अली खान हिला एनसीबीच्या अधिकाऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार आहेत. त्याबरोबरच दीपिका पदुकोण हिलाही नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या पथकसमोर चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.