नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना झाली कोरोनाची लागण

September 24,2020

मुंबई : २४ सप्टेंबर - राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना करोनाची लागण झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे. एकनाथ शिंदे यांनी आपली प्रकृती सध्या ठीक असल्याचं सांगितलं आहे. तसंच संपर्कात आलेल्यांना योग्य काळजी घेण्याचं तसंच करोना चाचणी करण्याची विनंती केली आहे.

एकनाथ शिंदे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “काल मी माझी कोव्हीड-१९ ची तपासणी करून घेतली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने प्रकृती ठीक आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी आणि स्वतःची कोव्हीड चाचणी करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, ही विनंती”.