चंद्रपुरात दोन प्रकरणांमध्ये अवैध दारू पकडली

September 24,2020

चंद्रपूर : २४ सप्टेंबर - ब्रह्मपुरी शहरात अवैध धंदे मोठय़ा प्रमाणावर फोफावत असल्याचे चित्र दिसून येत आहे. पण ब्रह्मपुरी पोलिसांनी अवैध धंदे करणार्या विरोधात धडक मोहीम सुरू केल्याचे पाहण्यास मिळत आहे. काही दिवसांपूर्वी उपविभागीय पोलिस अधिकारी मिंलीद शिंदे यांनी अवैधपणे सुरू असलेल्या कोंबडा बाजारात धाड टाकून लाखों रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. यामध्ये अनेक आरोपी ताब्यात घेतले होते.

आज उपविभागीय पोलिस अधिकारी मिंलीद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गोपनीय माहितीवरून कहाली टी पॉईंटजवळ नाका बंदी लावण्यात आली. तोरगावरून भरधाव वेगाने एक कार ( ट- 31-2808 ) येत असल्याचे दिसून आले. त्या वाहनाची तपासणी केली असता ८ पेट्या अवैध दारू आढळून आली. सदर गाडीमध्ये चालकास दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. मनोज मिसार (२८), गणेश सोडवले (२३) या दोन आरोपींना ताब्यात घेऊन गुन्हा नोंदविण्यात आला. तसेच दुसर्या कारवाईत तोरगाव नाक्यावर नाकाबंदी केली. एका (ट- 34-इ-4282) वाहनाने 0३ पेट्या जप्त करण्यात आल्या. तीन पेट्या देशी दारू व एक दुचाकी (ट-36अट- 5190) या वाहनाने एक पेटी व असा एकूण १,७0,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला . या कारवाईत वैभव वेलथरे (२१), महेश कांबळी (२३) यांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला. 

या दोन्ही कारवाईमध्ये उपविभागीय पोलिस अधिकारी मिंलिद शिंदे, पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे, पो.ह. खोब्रागडे, नापोशि मुकेश, पोशि योगेश, अजय नागोसे, अजय कताईत, पो.ह. नैताम, पो.शि. विशाल शिंदे यांनी केली.