वृद्ध बैल कत्तलीसाठी नेताना पोलिसांनी ताब्यात घेतले, दोघांना अटक

September 24,2020

वर्धा : २४ सप्टेंबर - देवळी शहरातील विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलच्या कार्यकर्त्यांना अल्लीपूरवरून एम. एच. 32 बीई -2690 क्रमांकाच्या वाहनातून कत्तलीसाठी बैल नेण्यात येत असल्याची माहिती मिळाली असता देवळी पोलिसांनी यवतमाळ मार्गा वरील शिरपूर पथकर नाक्यावर नाकेबंदी करून वाहनांची तपासणी केली असता वृद्ध पाच बैल कोंबून असल्याचे आढळून आले.

 देवळी पोलिसांनी वाहनाची तपासणी करून दोघांना अटक केली. वाहन चालक राजेश टेकाम (26) रा. कळंब आणि संतोष परचाके रा. कळंब (28) यांना अटक करण्यात आली. अल्लीपूरवरून नजीर मौलाना यांनी वाहनातून बैल भरून दिल्याची माहिती चालकाने पोलिसांना दिली. हे वाहन कळंब येथील रहिवाशी फरहान कुरैशी रा. कळंब यांची असल्याचे तपासाअंति निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाही विश्व हिंदू परिषद देवळी तालुका अध्यक्ष मोहन जोशी आणि बजरंग दलाचे देवळी तालुका अध्यक्ष संजय कामडी, हर्शल कैकाडी, शिवम कामडी, अमित इंगळे, मोहन चावके, प्रफुल येळणे, अनिकेत मरघडे इत्यादी युवा कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. पकडलेले बैल पडेगाव येथील गो संवर्धन संस्थेत पाठविण्यात आहे. पुढील तपास ठाणेदार लेव्हरकर यांच्या मार्गदर्शनात देवळी पोलिस करीत आहेत.