वर्धेत ११५ नवे रूग्ण.तर ३ रुग्णांचा मृत्यू

September 20,2020

नागपूर : २० सप्टेंबर -.वर्धा  जिल्ह्यात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या  वाढतच आहे.रविवारला ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.आता मॄतकांची संख्या ८८ वर पोहचली आहे. रविवार रोजी जिल्ह्यात एकूण ११५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यामध्ये वर्धा तालुक्यात ५४ रूग्णांमध्ये ३७ पुरूष व १७ महिलांचा समावेश आहे. देवळी तालुक्यात १३ रूग्णांमध्ये ६ पुरूष व ७ महिलांचा समावेश आहे. सेलू येथील ७ रूग्णांमध्ये पुरुष ६ तर १ महिला आहे. आर्वी ९ रुग्णांमध्ये पुरुष ४.व महिला ५ आहे. कारंजा ६ पुरुष ३ महिला ३.आष्टी ४ रुग्णांमध्ये १ पुरुष तर ३ महिला कोरोनाबाधित आढळले आहे. समुद्रपूर तालुक्यात १  महिलेचा समावेश आहे. हिंगणघाट तालुक्यात २१ रूग्णांमध्ये १३ पुरूष तर ८ महिलांचा समावेश आहे. एकूण ११५ रूग्णांमध्ये ७० पुरूष तर ४५ महिलांचा समावेश आहे.तर वर्धेत ३  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत ३३९० रुग्ण कोरोना बाधितांची संख्या पोहचली तर १६३३ रुग्ण कोरोनामुक्त झाले.१६६८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.