नागपुरात कोरोनाचा कहर सुरूच, आज रुग्णसंख्येत घट

September 20,2020

नागपूर : २० सप्टेंबर - कोरोनाचा कहर नागपुरात सतत सुरु असला तरीही आज रुग्णसंख्येत थोडी घट दिसून आली आहे. आज नागपूर शहरात १२२६ नवीन बाधित रुग्ण आढळले असून बाधित रुग्णांची संख्या ६३७५७ इतकी झाली आहे. रुग्णसंख्या कमी झाली असली तरीही मृत्युसंख्येत काही घट होताना दिसत नाही आज नागपूर शहरात ५४ रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्युसंख्या २०४४ वर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज १६१० रुग्ण कोरोनामुक्त झाले असून कोरोनमुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ५१५५६ वर पोहोचली आहे. यात २९२५७ रुग्ण हे घरीच विलगीकरणातून बरे झाले आहेत. 

नागपुर शहरात जनता संचारबंदी खूप  फायद्याची  ठरली असून आज त्याचा लाभ दिसून आला. मात्र रोज होणाऱ्या रुग्णामृत्यूंमुळे शहरात चिंतेचे वातावरण आहे. आज झालेल्या ५४ मृत्यूंपैकी ९ मृतक ग्रामीण भागातील, ४० शहरातील तर ५ जिल्ह्याबाहेरील रुग्णांचा समावेश आहे. तर १२२६ नवीन बाधितांपैकी २२८ रुग्ण ग्रामीण भागातील, ९९३ शहरी भागातील तर ५ जिल्ह्याबाहेरील रुग्ण आहेत. सद्यस्थितीत नागपूर शहरात १०१५७ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु असून त्यातील ५०८३ रुग्ण हे घरीच विलगीकरणात उपचार घेत आहेत. १६१० रुग्ण कोरोना मुक्त झाल्यामुळे नागपूर शहराचा रिकव्हरी रेट ८०.८६ इतका झाला आहे. एकूण ५१५५६ रुग्ण कोरोनमुक्त झाले असून त्यातील २९२५७ रुग्ण हे घरीच विलगीकरणातून कोरोनमुक्त झाले आहेत.