जेसीबीच्या धडकेत शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

September 20,2020

गोंदिया : २० सप्टेंबर - अर्जुनी मोर  तालुक्यातील नवेगावबांध पोलिस स्टेशन अंतर्गत कोहमारा- वडसा मार्गावरील ऐरंडी-देवलगाव शेतशिवारात जेसीबीच्या धडकेत एका शेतकèयांच्या जागीच मृत्यू झाला.  हकीम ढोमनू मेश्राम (४५, रा. बाराभाटी) असे मृतकाचे नाव आहे.

मृतक हकीम मेश्राम हे एेंडी-देवलगाव परिसरातील शेतशिवारातून गवताच्या पेंड्या घेऊन बाराभाटीकडे जात असताना नवेगावबांधकडून अर्जुनी मोर कडे भरधाव जाणाऱ्या  विना क्रमांकाच्या जेबीसीने त्यांना धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही धडक ऐवढी जबर होती त्यांच्या शरीराचे दोन तुकडे झाले. घटनेनंतर जेसीबी चालक फरार झाला. सदर जेसीबी हा भंडारा जिल्ह्यातील पोहरा येथील असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान याप्रकरणी नवेगावबांध पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आली असून पुढील तपास ठाणेदार दिनकरराव ठोसरे यांच्या मार्गदर्शनात पोलिस हवालदार शब्बीर शेख करीत आहेत.