बुलढाण्यात भूजलपातळीत लक्षणीय वाढ

September 20,2020

बुलढाणा : २० सप्टेंबर - बुलडाणा तालुक्यात 19 सप्टेंबर रोजी झालेल्या जोरदार पावसामुळे जलपातळीत वाढ झाली आहे. या पावसामुळे विहिरी, तलाव ओव्हर फ्लो झाले आहेत. गेल्या 24 तासामध्ये बुलडाणा तालुक्यात 22.8 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील तलाव, लघुसिंचन प्रकल्प, धाड, मासरूळ, देऊळघाट या परिसरातील लहान-मोठे तलाव ओसांडून वाहत आहेत. येळगाव धरणही पूर्ण क्षमतेने भरल्याने तालुक्यातील भूजलपातळीत वाढ झाली आहे.

गतवषीं पावसाळा जरी जून महिन्यात सरू झाला तरी ऑक्टोबरमध्ये पावसाने धरणे, तत्नाव तुडुंब भरले होते. मात्र, यंदा सप्टेंबरमध्येच तालुक्यातील बहुसंख्य नाले तुडुंब भरून वाहत आहेत. विहिरींची पाणीपातळी बरीच वर आली आहे. तीन-चार वर्षांपूर्वी निसर्गाच्या लहरीपणामुळे पावसाने दांडी मारल्याने अनेक शेतकजयांच्या फळबागा पाण्याअभावी पूर्णपणे वाळून गेल्या होत्या. शेतकर्यांानी विहिरींना पाणी व सिंचनाकरिता लाखो रुपयांचा खर्च केला होता.

 काही फळबाग उत्पादक शेतकजयांनी लाखो रुपये पाण्यासाठी खर्च करून टँकरद्वारे पाणी मागवून फळबागा वाचविण्याच्या प्रयत्न केला होता. बुलडाणा शहराला येळगाव धरणावरून पाणी पुरवठा करण्यात येतो. सोबतच परिसरातील अनेक गावांनाही याच धरणावरून पाणी दिल्या जाते. परंतू दरवर्षी तालुक्यातील भादोला, सुंदरखेड, देऊळघाट आदी गावांतील नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या भीषण टंचाईला सामोरे जावे लागते.

 सध्याही काही गावांमध्ये तर आठवडा किंवा पंधरा दिवसांनी ग्रापपंचायतीच्यावतीने पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र आता पाऊस चांगला झाल्याने भविष्यातील पाणी टंचाईचा प्रश्न दूर झाल्याचे दिलासादायक चित्र बुलडाणा तालुक्यात दिसून येत आहे.