बुलढाण्यात नवे पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया रुजू

September 20,2020

बुलडाणा : २० सप्टेंबर - पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांची यवतमाळला बदली झाल्यामुळे त्यांच्या जागी नव्याने रुजू झालेले अरविंद चावरिया यांनी 20 सप्टेंबर रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात पदभार स्वीकारला आहे.

यावेळी पोलिस खात्यातील विविध अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. पुष्पगुच्छ देऊन भुजबळ यांनी अरविंद चावरिया यांचे स्वागत केले. त्यानंतर पोलीस अधिकारी सहकार्यांसोबत जिल्ह्याच्या कायदा व सुव्यवस्थेची तसेच कोरोना संदर्भात पोलिसांकडून कामाची माहीती त्यांनी त्यांनी जाणून घेतली.