राज्यमंत्री बच्चू कडू सहकुटुंब कोरोना पॉझिटिव्ह

September 20,2020

अमरावती : २० सप्टेंबर - राज्यमंत्री बच्चू कडू यांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सगळ्यांनी करोना चाचणी करुन घ्यावी असं ट्विट करत बच्चू कडू यांनी ही माहिती दिली आहे. शुक्रवारीच उर्जा मंत्री नितीन राऊत आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ या दोघांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. आता राज्यमंत्री बच्चू कडू यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

मागील काही दिवसांपासून राज्यमंत्री बच्चू कडू हे सातत्याने लोकांच्या संपर्कात येत होते. अनेक कार्यक्रमांनाही त्यांची उपस्थिती होती. बच्चू कडू यांच्या पत्नी नयना कडू यांनाही करोनाची लागण झाली आहे. बच्चू कडू हे अचलपूरहून अमरावतीच्या दिशेने रवाना झाले आहेत. ते आता उपचारांसाठी कोणत्या शासकीय रुग्णालयात दाखल होणार हे अद्याप समजू शकलेलं नाही.