रानडुकराच्या मासासह दोघांना अटक

September 20,2020

 गोंदिया : २० सप्टेंबर - अर्जुनी मोर तालुक्यातील दिनकरनगर येथे रानडुकराच्या मांसासह दोघांना अटक करण्यात आली. ही कारवाई गोठणगाव वनपरिक्षेत्राधिकारी यांच्या पथकाने केली. रमेश गणेश डकुवा व राम माणिक सिंग (रा. दिनकरनगर) अशी आरोपींचे नावे आहेत.

दिनकरनगर येथे रानडुकराची शिकार करून मांस विक्री केली जात आहे, अशी माहिती गोठणगाव वनक्षेत्राधिकारी पाटील यांना मिळीली. या माहितीच्या आधारावर वनविभागाचे अधिकारी, कर्मचार्यांनी दिनकरनगर येथील रमेश गणेश डकुवा यांच्या घराची झडती घेतली. यादरम्यान त्यांच्याकडे रानडुकराचे मांस दिसून आला. त्याची विचारपूस केली असता राम माणिक सिंग याच्याकडून मांस विकत घेतल्याचे त्याने कबूल केले. दरम्यान वनविभागाच्या अधिकार्यांनी मांस ताब्यात घेऊन दोन्ही आरोपींना अटक केली आहे.