उमरेडखेडमध्ये जुगार अड्ड्यावर धाड, १५ अटकेत

September 20,2020

यवतमाळ : २० सप्टेंबर - उमरखेड शहरातील जुन्या वस्तीत अनेक दिवसापासुन सुरू असलेल्या जुगार अड्डय़ावर उपविभागीय पोलिस अधिकारी पथकाने धाड टाकून जुगार खेळणार्या १५ जणांना अटक केली असून, ३ लाख १७ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. या झाडीमुळे उमरखेड पोलिस स्टेशनच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

शहरातील गोचर स्वामी वॉर्डात बंटी उर्फ स्वप्नील सुभाष श्रीवास्तव यांचे घरी जुगार सुरु असल्याच्या माहितीवरून धाड टाकण्यात आली. १५ जुगार्यांकडून रोख ९0 हजार ८२0 रुपये, ३ मोटर सायकल किंमत १ लाख २५ हजार व १२ मोबाईल किंमत १ लाख दोन हजार असा ३ लाख १७ हजार ८२0 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटक करण्यात आलेल्यां मध्ये बंटी उर्फ स्वप्निल सुभाष श्रीवास्तव रा. गोचर स्वामी वॉर्ड, विलास प्रकाश भांडवले रा. इंदिरानगर ,नंदकिशोर वामनराव देवसरकर रा. देवसरी, कृष्णा संभाजीराव शिंदे रा. करोडी, संजय बालाप्रसाद श्रीवास्तव रा. सिद्धेश्वरनगर, परमेश्वर ग्यानबा कणेवार रा. सोईट महागाव ,आसिफ खान अनिस अहमद खान रा. सराफा लाईन गजानन पांडुरंग काटे रा. चालगणी ,अर्जुन शामराव वानखेडे रा. राजेंद्र प्रसाद वॉर्ड, देवराव उत्तमराव शिंदे रा. करोडी, तुकाराम शामराव शिंदे रा. करोडी ,संतोष नामदेव गायकवाड रा. ढाणकी, नारायण किसन दुधे रा . बाळदी, ग्यानबा बंडू वानखेडे रा. लिंबगव्हाण यांना अटक करण्यात आली असून सदर कारवाई पीएसआय महेश घुगे ,शेख वसीम ,उमेश चव्हाण ,युनुस भातमासे ,सुनील केंद्रे ,कोमल पवार ,रवी कपिले ,हनुमंत मुसळे, देवेंद्र होले ,अविनाश शहारे ,राजपाल राठोड, आकाश जाधव ,प्रवीण राठोड ,लखन कैतवास ,प्रीती बावनकुळे ,पूनम बावनकुळे ,राखी शिरसाट, अलका बोरकर ,अश्विनी सूर्यवंशी यांनी पार पाडली.