पुलगावात युवकाची घराच्या अंगणातच केली हत्या

September 20,2020

वर्धा : २० सप्टेंबर - पुलगाव शहरात शनिवारी सकाळी हरिरामनगर परिसरात मोठा नाला येथे युवकाची धारदार शस्त्राने घराच्या अंगणातच हत्या करण्यात आली. आरोपी सागर शंकरराव कांबळे वय अंदाजे २८ ते ३0 याने त्याच्यासोबत राहणारा मृत्तक राकेश ऊर्फ बाबू गुप्ता वय अंदाजे ३0 वर्षे याचा धारदार शस्त्राने गळय़ावर वार केला. यात राकेश हा घटनास्थळी मरण पावला. ते दोन्ही शहरातील बाजारात हमालीचे काम करीत होते. दोघांमध्ये अनेक वेळा हमालीच्या पैशांमुळे वाद होत होते,अशी चर्चा आहे. आज सकाळी १0.२५ च्या सुमारास ही घटना घडली आहे.

पुलगाव पोलिसांनी हत्येची सूचना मिळताच ठाणेदार रवींद्र गायकवाड आपल्या पोलीस कर्मचारी विवेक बन्सोड, राजेंद्र हाडके, प्रदीप सहाकाटे ,शरद पांडे या चमूसह घटनास्थळी दाखल झालेत. आरोपी सागर कांबळेला ताब्यात घेतले व ज्या तेज शस्त्राने हत्या केली त्याचा नाल्यात शोध घेणे सुरु केली आहे.

मृत्तक व आरोपी हे जवळपास राहत होते. दिवसभर हमालीच्या काम करत होते सायंकाळी रोज दारुसोबत पित होते. तसेच दोघेही सोबतच हमालीचे काम करीत होते. अशी चर्चा हरिराम नगर परिसरात आहे भा.दं.वि.३0२ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. अधिक तपास पोलिस करीत आहे. पोलिस तपासानंतर हत्येचे कारण पुढे येईल. पोलिस हत्या काय कारणाने झाली त्याची शोध लावत आहे. मृत्तक व आरोपी दोन्ही अविवाहित आहे. आरोपीच्या घरी सागर व आई हे हातमजुरी काम करत होते. मृत्तक हा राकेश ऊर्फ बाबु नावाने ओळखला जात होता आई वडील आहे हे दोन्ही रोज मजुरीचे काम करत होते.