श्रमिक स्पेशल ट्रेनमध्ये ९७ प्रवाश्यांचा मृत्यू

September 20,2020

नवी दिल्ली : २० सप्टेंबर - लॉकडाऊनदरम्यान किती स्थलांतरित मजुरांचा मृत्यू झाला? सोमवारी सुरू झालेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात या प्रश्नावरून विरोधकांनी सरकारला घेरले होते. स्थलांतरित मजुरांच्या मृत्यूसंदर्भात कोणताही डेटा उपलब्ध नसल्याचे उत्तर सरकारने देताच विरोधक आणखी आक्रमक झाले होते. यानंतर सरकारला शुक्रवारी पुन्हा एकदा हा प्रश्न विचारण्यात आला. लॉकडाऊन दरम्यान र्शमिक स्पेशल ट्रेनमध्ये किती स्थलांतरित मजुरांचा मृत्यू झाला? या प्रश्नावर राज्यसभेत सरकारने उत्तर दिले. ९ सप्टेंबरपयर्ंत एकूण ९७ जणांचा प्रवासादरम्यान मृत्यू झाला, असे सरकारने सांगितले.

तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी राज्यसभेत हा प्रश्न विचारला होता. ९ सप्टेंबरपयर्ंत एकूण ९७ स्थलांतरित मजुरांचा प्रवासादरम्यान स्पेशल ट्रेनमध्ये मृत्यू झाला आहे. या ९७ मृतांपैकी ८७ मृतदेह राज्य पोलिसांकडून पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले. आतापयर्ंत संबंधित राज्य पोलिसांकडून ५१ पोस्टमॉर्टम रिपोर्ट हाती आले आहेत. यात ह्रदय विकाराचा झटका, हृदयरोग, मेंदूत रक्तस्राव, फुफ्फुस आणि यकृताच्या आजाराची कारणे देण्यात आली आहेत, अशी माहिती रेल्वे रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी दिली. यापूर्वी मे महिन्यात ८0 स्थलांतरित मजुरांचा मृत्यू झाल्याचे वृत्त देण्यात आले होते. र्शमिक स्पेशल ट्रेनमध्ये ९ मे ते २९ मे दरम्यान ८0 स्थलांतरित मजुरांचा मृत्यू झाला, अशी माहिती रेल्वे पोलिसांच्या माहितीवरून देण्यात आली होती. कोरोना व्हायरसच्या संकटानंतर देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला. या काळात स्थलांतरित मजुरांचे प्रचंड हाल झाले. लाखो स्थलांतरित मजूर रस्त्यावर आले होते. यावेळी अनेकांच्या मृत्यूच्या बातम्याही समोर आल्या. या विषयावर सोमवारी संसदेत सरकारला प्रश्न विचारला गेला. पण यासंदर्भात कुठलीही माहिती नसल्याचे सरकारने सोमवारी सांगितले होते. लॉकडाऊनदरम्यान जवळपास ८0 कोटी नागरिकांना अतिरिक्त रेशन दिले गेले. ही प्रक्रिया नोव्हेंबरपर्यंत सुरू राहील, असे सरकारने सांगितले होते.