गडचिरोलीत २३ ते ३० सप्टेंबर जनता कर्फ्यू

September 20,2020

गडचिरोली : २० सप्टेंबर - मागील काही दिवसांपासून गडचिरोली शहरात कोरोनाव्हायरस चा प्रसार मोठ्या प्रमाणात होत असून यामुळे काही नागरिकांचे मृत्यू झालेले आहे. हा वाढत असलेला प्रसार थांबविण्यासाठी व जनतेचे सुरक्षा हित लक्षात घेऊन गडचिरोली शहरातील व्यापारी संघटना, नगर परिषद गडचिरोली प्रशासन व सर्वपक्षीय नेत्यांनी दिनांक 23 ते 30 सप्टेंबर 2020 ला बुधवार ते बुधवार गडचिरोली शहर पूर्णपणे बंद ठेवून जनता कर्फ्यू करण्याचा चा निर्णय घेतलेला आहे.

  या निर्णयानुसार गडचिरोली शहरातील सर्व दवाखाने,मेडिकल व वैद्यकीय व्यवस्था सुरू राहनार असून या जनता कर्फ्युला सर्व जनतेने सहकार्य करून यशस्वी करावे, असे आवाहन गडचिरोली शहरातील व्यापारी संघटना, नगरपालिका गडचिरोली व सर्वपक्षीय नेत्यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जनतेला केले आहे.

या पत्रकार परिषदेला गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी, माजी आमदार तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. नामदेवराव उसेंडी नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष सौ योगिताताई पिपरे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष रविभाऊ चन्नावार,उपाध्यक्ष हरीशजी राठी, दिलीपभाऊ सारडा, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविभाऊ वासेकर, शिवसेनेचे नेते नंदूभाऊ कुमरे, भारतीय जनता पार्टी जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे, नगर परिषदेचे उपाध्यक्ष अनिल भाऊ कुनघाडकर ,भाजपा शहराध्यक्ष मुक्तेश्वरजी काटवे ,काँग्रेस युवा आघाडीचे अध्यक्ष महेंद्रजी ब्राह्मणवाडे, नगरसेवक केशव निंबोळ, गडचिरोली, पंचायत समिती उपसभापती विलासजी दशमुखे ,भाजीपाला संघटनेचे अध्यक्ष प्रशांत फुफलवार सचिव भोजराज खोडवे, उपाध्यक्ष अझरुद्दीन शेख, हॉटेल असोसिएनचे अध्यक्ष चंद्रकांत पतरंगे, सचिव रोशन कवाडकर, हेमंतजी राठी , प्रफुल बिजवे यांचेसह शहरातील व्यापारी दुकानदार उपस्थित होते,

00000000000000000