मास्क न लावणा-या १६४ नागरिकांकडून दंड वसूली

September 15,2020

नागपूर : १५ सप्टेंबर -  नागपूरात रुग्णांची संख्या सतत वाढत आहे तसेच मृतांची संख्या पण वाढत चालली आहे. यावर नियंत्रण करण्यासाठी महानगरपालिकेचे उपद्रव शोध पथक दररोज दहा ही झोनमधील मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार नागरिकांविरुध्द कारवाई करत आहे. नागरिकांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी वारंवार मास्क लावणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, हात स्वच्छ धुणे इ. ची सूचना नागपूर मनपा व्दारे वारंवार केली जात आहे. तरीसुध्दा नागरिक मास्क शिवाय फिरत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून मास्क न घातल्याबददल रु ५००/- दंड आकारण्यात येत आहे.

महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी आज  मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार १६४ नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून रुपये ५०० प्रमाणे  ८२ हजार रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही दिवसात शोध पथकांनी ५६३४ नागरिकांविरुध्द कारवाई करुन रु. ११,७६,०००/- चा दंड वसूल केला आहे.