ऑक्सिजनचा जीवनावश्यक वस्तूंमध्ये समावेश करण्यात यावा

September 15,2020

नागपूर : १५ सप्टेंबर - नागपूर शहरात गंभीर रुग्णांची संख्या सतत वाढत असल्यामुळे कोरोना रुग्णालयामध्ये ऑक्सिजनचा काळाबाजार केला जात आहे. असा आरोपी विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी केला असून ऑक्सिजनचा जीवनावश्यक वस्तूंमध्ये समावेश करण्याची मागणी एका अर्जाद्वारे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली.

 या सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये वीरेंद्र शाहू, वासुदेव मिश्रा, जोसेफ जॉर्ज, अनुसया काळे, विनोद छाबरानी यांचा समावेश आहे. या सामाजिक कार्यकर्त्यांनी कोरोनाशी संबंधित समस्येकडे न्यायालयाचे लक्ष वेधले आहे. शहरातील काही रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटर व ऑक्सिजनचे वेगवेगळे शुल्क आकारले जात आहे. तसेच रुग्णांकडून पीपीई किट चे पैसे वसूल केले जात आहेत. रुग्णांना बेड मिळत नसल्यामुळे उपचाराअभावी त्यांचा मृत्यू होत आहे. हि बाब लक्षात घेऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल करण्यात आला आहे.