उदय सामंत यांची संस्कृत विद्यापीठाला भेट

September 15,2020

नागपूर : १५ सप्टेंबर - कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

यांनी भेट दिली. विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्रो. श्रीनिवास वरखेडी यांनी सामंत यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. याप्रसंगी रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल, कुलसचिव प्रो. विजयकुमार, वित्त व लेखा अधिकारी डॉ. रामचंद्र जोशी, विद्यापीठ नियोजन विकास मंडळाचे संचालक डॉ. प्रसाद गोखले, रामटेक परिसर संचालक प्रो. कविता होले, डॉ. महेश साळुंके तसेच विभागप्रमुख, प्राध्यापक, प्रशासकीय अधिकारी विशेषत्वाने उपस्थित होते.

 प्रारंभी महाकवी कालिदास, ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार आणि रा. स्व. संघाचे द्वितीय सरसंघचालक श्रीगुरुजी यांच्या स्मारकस्थळी पुष्पार्पण केले. त्यानंतर विश्वविद्यालय अधिकार्यांसह झालेल्या बैठकीत संस्कृत विश्वविद्यालयाच्या प्रलंबित कामांसह कोविड परिस्थितीतअंतिम परीक्षांचे नियोजन, विकासकामे, आकृतीबंध, निधी इ. विविध कार्यांचा आढावा घेतला. कुलसचिव प्रो. विजयकुमार यांनी प्रारंभी विश्वविद्यालयाची माहिती दिली. रामटेक परिसर संचालक प्रो.कविता होले यांनी विश्वविद्यालयाच्या अंतिम परीक्षांच्या नियोजनासंदर्भात माहिती दिली.

 कुलगुरू प्रो. श्रीनिवास वरखेडी यांनी विश्वविद्यालयाला मुलींच्या व कर्मचारी वसतिगृहासाठी आवश्यक जमीन रामटेकमधील जमीन व निधी, वारंगामध्ये आंतरराष्ट्रीय शैक्षणिक केंद्र स्थापन करण्यासाठी विकासनिधी तसेच 2015 पासून महाराष्ट्र शासनाद्वारे प्रलंबित असलेल्या महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्काराच्या वितरणासंदर्भात माहिती दिली. कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय उत्तम कार्य करीत असून, महाकवी कालिदासाच्या अभिधानाने स्थापन झालेल्या या विश्वविद्यालयाला शासन सर्वप्रकारचे सहकार्य करेल असेही त्यांनी आश्वासन दिले. रामटेकच्या नगरपरिषदेने रामटेकमधील ‘कालिदास स्मारक’ कालिदास विश्वविद्यालयाकडे सोपविण्याचा प्रस्ताव दिल्यास कालिदास स्मारकाची संपूर्ण जबाबदारी घेण्यासाठी विश्वविद्यालयाच्या कुलगुरूंनी आनंदाने मान्यता दिली आहे.

महर्षी पाणिनी संगणक केंद्राचे उद्घाटन

 कविकुलगुरू कालिदास संस्कृत वि-रु39यवविद्यालयात रुसा निधीतून महर्षी पाणिनी संगणक केंद्र उभारण्यात आले असून या केंद्राचे उद्घाटन उदय सामंत यांच्या शुभहस्ते राष्ट्रीय मापदंडावर

आधारित हे संगणक केंद्र तयार करण्यात आले असून एकावेळेला 50 विद्यार्थी संगणक प्रशिक्षण घेवू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. आधुनिक युगात संगणकासाठी संस्कृत ही सर्वाधिक अचूक भाषा हे सिद्ध व मान्य झाले आहे. महर्षी पाणिनी हे भारतातील आ़द्य व्याकरणकार असून संस्कृत भाषेतील व्याकरण शास्त्रावरील ग‘ंथाची रचना त्यांनी केली आहे. वैज्ञानिकदृष्ट्या देखील पाणिनीय व्याकरण सर्वोत्कृष्ट मानले जाते. सदर संगणककेंद्राचे प्रमुख राजीवरंजन मिश्रा आहेत.