पाण्यात पोहताना युवकाचा मृत्यू

September 15,2020

अमरावती : १५ सप्टेंबर  - दुचाकी धुण्यासाठी नदीवर गेलेल्या एका युवकाचा पाण्यात पोहताना मृत्यू झाल्याची घटना मेळघाटातील राणीतांबोली येथील गडगा नदीपात्रात घडली. गजानन झारेकर असे नदीत बुडून मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.

मेळघाटातील गडगा नदीपात्रात दुचाकी धुतल्यानंतर गजानान आंघोळ करण्यासाठी खळखळणाऱ्या पाण्यात गेला. मात्र, पात्रात उतरल्यानंतर खोलीचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. गजानन हा आपल्या दोन मित्रांसोबत ८ किलोमीटर अंतरावर असलेल्य राणी तांबोली गावाजवळून वाहणाऱ्या गडगा नदीवर गेला होता. गाडी धुतल्यानंतर हा तरुण थोड्या अंतरावर पोहण्यासाठी गेला असता त्याचा पाण्यात बुडून अंत झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.