नागपुरात ५ दिवसात ६६ रुग्णांचा मृत्यू, प्रशासन हादरले

August 05,2020

नागपूर : ५ ऑगस्ट - नागपूर शहरात कोरोनाचा प्रकोप चांगलाच वाढला असून ऑगस्ट महिन्याचा ५ दिवसात ६६ रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे उपराजधानि हादरली आहे. आज १५ रुग्णांचा मृत्यू झाला असून २६९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहे. बाधितांची संख्या ६७५२ झाली आहे. तर मृत्युसंख्या २०४ वर पोहोचली आहे. 

एकीकडे लॉक डाऊनमध्ये शिथिलता देण्याचा प्रशासनाकडून प्रयत्न सुरु असताना रोज शेकडो बाधित रुग्ण आढळत आहेत. आज २६९ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून त्यात १७८ शहरातले तर ९१ ग्रामीणमधील रुग्णांचा समावेश आहे. मृतकियांचा आकडा २०४ वर पोहोचला आहे. त्यात १३१ शहरातले , ३१ ग्रामीण भागातील तर ४० रुग्ण जिल्ह्याबाहेरील आहेत. आजपर्यंत ६७५२ बाधित रुग्ण आढळले आहेत त्यात ४६५१ शहरातले तर २१०१ ग्रामीण भागातील आहेत. आज ८२ रुग्ण कोरोनमुक्त झाले असून कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ३९३३ वर पोहोचली आहे. आज २६३० रुग्णांवर उपचार सुरु असून १७२६ शहरातले आहेत तर ग्रामीण भागातले ९०४ रुग्णांचा समावेश आहे. २६९ रुग्णांमध्ये आयजीएमसी ६३, जीएमसी ५८, एम्स २५, निरी १९, माफसू १९, खासगी ४७, अँटीजेन ३८ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.