नागपूरजवळील मानस ऍग्रो मध्ये बॉईलरचा स्फोट ५ मजुरांचा मृत्यू

August 01,2020

नागपूर : १ऑगस्ट -  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात सुरु असलेल्या मानस ऍग्रो प्रायव्हेट लिमिटेड साखर कारखाण्यात बायोडायजेस्टरमध्ये स्फोट झाल्याने ५ कामगारांचा मृत्यू झाल्याने एकाच खळबळ माजली आहे. 

आज दुपारी या बॉयलर जवळ वेल्डिंग चे काम सुरु होते अचानक स्फोट झाल्यामुळे एक वेल्डर व ४ हेल्पर यांचा मृत्यू झाला. मृतकांमध्ये मंगेश प्रभाकर नौकारकर वय २१, लीलाधर वामनराव शेंडे वय ४७, वासुदेव विठ्ठल लडी वय ३०, सचिन वाघमारे वय २४, प्रफुल्ल पांडुरंग मून वय २५ राहणार वडगाव यांचा समावेश आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्फोट इतका जबरदस्त होता कि पूर्ण परिसर हादरून गेला. बेला पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला त्यांनी मृतदेह ताब्यात घेतले आणि काही कामगार जखमी झाले असून त्यांना उपचाराकरिता रुग्णालयात पाठविले आहे. या मानस ऍग्रो प्रायव्हेट लिमिटेडचे पहिले नाव पूर्ती साखर  कारखाना असे होते. हा स्फोट कशामुळे झाला याचा शोध बेला पोलीस घेत आहेत.