कोरोनाशी लढण्यासाठी भारताने केलेल्या उपाययोजनांचे जगभरात कौतुक

May 25,2020

नवी दिल्ली, 25 मे - कोरोनाचा मुकाबला करताना भारताने योग्यवेळी धाडसी निर्णय घेत लॉकडाऊन लागू केले. त्यामुळे भारतात कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात आहे. अनेक देशांनी लॉकडाऊनचा निर्णय घ्यायला विलंब केल्यामुळे  तेथील परिस्थिती हाताबाहर गेली. त्यामुळे भारताने तयार केलेल्या कोविड मॉडेलची आज जगात प्रशंसा केली जात आहे. अशी माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली.

लॉकडाऊनच्या आधी देशात कोरोनाबाधितांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी 3.4 दिवस होता. आता तो 13 दिवसांपेक्षा जास्त झाला हे. याडे डॉ. हर्षवर्धन यांनी लक्ष वेधले. डॉ. हर्षवर्धन यांनी दोन दिवसांपूर्वीच जागतिक आरोग्य  घटनेच्या
कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली आहेत. देशात 7063 कोविड केअर सेंटर विकसित करण्यात आले आहेत. याठिकाणी 6.5 लाख बेड आहेत. यासिवाय 2065 कोविड समर्पित रुग्णालयात 1.77 लाख बेड आहेत. म्हणजे आज आपल्या देशात कोविड बाधितांसाठी 10 लाख बेड आहेत. असे हर्षवर्धन म्हणाले. कोरोनावर लस शोधण्यासाठी संपूर्ण जगात युद्धपातळीवर संशोधन सुरू आहे. हे संशोधन शैक्षणिक तसेच उद्योग पातळीवरही सुरू आहे. भारतातही संस्काराच्या आर्थिक मदतीने असे संशोधन होत आहे, असे हर्षवर्धन यांनी म्हटले आहे.