कोविड-१९ साठी आणखी ७.३१ लाख रुपयांची देणगी

July 04,2020

विदर्भ रिलीफ कमिटी, नागपूर साठी उर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना केला धनादेश सुपूर्द.
* व्हीएसपीएमएएचई संस्थेअंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांनी केली स्वेच्छेने मदत.
* आतापर्यंत कर्मचाऱ्यांनी दिली एकूण ८१.३१ लाख रुपयांची देणगी.

नागपुर : “व्हीएसपीएम अकॅडेमी ऑफ हायर एज्युकेशन, नागपूर या संस्थेअंतर्गत कार्यरत एनकेपी साळवे वैद्यकीय महाविद्यालय व लता मंगेशकर हॉस्पीटल, नागपूरच्या सर्व कर्मचाऱ्यांनी मिळून २९ मे २०२० ला ७४ लाख रुपयांची देणगी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-१९ ला प्रदान केली होती. त्यानंतर काही कर्मचाऱ्यांनी पुन्हा ७,३१,३७६ रुपयांचा निधी कोविड-१९ साठी उभारला. या सर्वांनी कठीण समयी मोठ्या सामाजिक जबाबदारीचे भान ठेऊन कोरोनासंबंधी गरजूंच्या मदतीसाठी हातभार लावला आहे.

त्यांनी स्वेच्छेने जमा केलेले स्वत:चे वेतन एकूण ७,३१,३७६ रुपये विदर्भ रिलीफ कमिटी नागपूरला कोविड-१९ साठी देणगी म्हणून देण्यात येत आहे. सर्व कर्मचाऱ्यांनी आजपर्यंत एकूण ८१.३१ लाख रुपयांची देणगी कोविड-१९ साठी दिली आहे. लता मंगेशकर हॉस्पीटल, डिगडोहचे १९० बेड्स कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. त्यात ११ आयसीयु बेड्सचा समावेश आहे. आपण नेहमीच शासनाला वैद्यकीय सेवेसाठी सर्वतोपरी मदत करू”, असे प्रतिपादन एनकेपी साळवे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. काजल मित्रा यांनी केले. राज्याचे उर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. डॉ. नितीन राऊत यांना कोविड-१९ साठी रु. ७,३१,३७६/- चा धनादेश संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. रणजीतबाबू देशमुख यांच्या हस्ते सुपूर्द करतांना त्यांनी वरील वक्तव्य केले. व्हीएसपीएमएएचई संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. आशिष देशमुख हे सुद्धा यावेळी उपस्थित होते.

डॉ. नितीन राऊत यांनी या कार्याची मुक्तकंठाने प्रशंसा केली. कोरोनाच्या लढाईत आपण नक्कीच यशस्वी होऊ. लता मंगेशकर हॉस्पीटल मध्ये या पुढेसुद्धा रुग्णांना चांगले उपचार मिळतील याची खात्री आहे, असे ते म्हणाले. कोविड-१९ साठी दिलेल्या देणगीबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. यावेळी श्री. सतीश चतुर्वेदी, श्री. गेव्ह आवरी, श्री. अनिस अहमद, श्री. शिवाजीराव मोघे, श्री. नरेंद्र जिचकार, संस्थेचे संयुक्त सचिव (कमांडर) डॉ. नटराजन, लता मंगेशकर हॉस्पीटलचे संचालक डॉ. विलास धानोरकर व इतर मान्यवर उपस्थित होते. सोशल डिस्टंसिंगचे पालन करून हा कार्यक्रम संपन्न करण्यात आला.