राज्य सरकार च्या विरोधात खासदार डॉ विकास महात्मे यांनी सीढी वर बसून केले आगळे -वेगळे आंदोलन

May 22,2020

भाजप वतीने "निष्क्रिय महाराष्ट्र सरकारचा निषेध आंदोलन" करताना खासदार पद्मश्री डाॅ विकास महात्मे यांनी  त्यांच्या नागपुरतील  निवासस्थानासमोर 12 फुट च्या सीढ़ी वर बसून आगळे-वेगळे आंदोलन केले.

यावेळी डॉ महात्मे म्हणाले कि महतिघाडी- बिघाडी- आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे आणि सतत बदलणा-या चुकीच्या निर्णयांमुळे महाराष्ट्रातील कोरोना संकट अधिकाधिक गडद होत चाललंय . स्थलांतरित कामगारांना दोन वेळचे जेवणही सरकार  देऊ शकत नाही; 100 पाॅझिटीव्ह रूग्ण कुठे गेले याचा पत्ताच नाही- एखाद्या बाॅम्ब सारखे ते धोकादायक आहेत; पोलीसांच्या सुरक्षेचा- - त्यांचे आरोग्य व त्यांच्यावर होणारे  हल्ले याचा प्रश्न ही गंभीर आहे; पत्रकारांच्या चाचण्या केल्या जात नाहीत ... असे किती तरी प्रश्न आहेत जे सरकारचा सांभाळण्यात अपयश आलेले आहे. म्हणून या निष्फळ उद्धव सरकारचा धिक्कार ...

याप्रसंगी विनायकजी चामाटे,  योगेशजी थापे व ईतर कार्यकते उपस्थित होते.