डिसीपी विनीता साहु यांनी शहरातील ४ हॉटेलवर केली कडक कारवाई

May 18,2021

• मनपाने केले हॉटेल 'सील.'
• नागपूर : लाकडाऊन व संचारबंदी काळात नियमांचे उल्लंघन करणा-या सदर आणि सिताबर्डी हद्दीतील McDonalds, Belgian Waffles, Cafe Illusions
Krishnum Plaza या आस्थापनांवर पेट्रोलिंग दरम्यान परिमंडळ २ च्या पोलीस उपायुक्त विनीता साहु यांनी सोमवारी सायंकाळचे सुमारास कडक कारवाई केली आहे.
सविस्तर असे कि, सदर हद्दीत असलेल्या McDonalds आणि Belgian Waffles या दोन्ही हॉटेल परिसरात वाहनांवर असलेल्या ग्राहकांना हॉटेलच्या माध्यमातून झोमँटोद्वारे फुडचा पुरवठा केल्याचे प्रत्यक्षरित्या दिसुन आल्याने मनपाचे सहाय्याने हे हॉटेल पोलीसांनी सील केले.
तसेच सिताबर्डी पोलीस स्टेशन हद्दीतील Cafe Illusions हॉटेलवर 25 हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आणि हॉटेल सील करण्यात आले. तसेच Krishnum Plaza येथे संचारबंदी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आणि साथरोग आजार कायद्यानुसार कारवाई करून हॉटेल सील करण्यात आले.